हातिव गावाची सर्वसाधारण माहिती

हातिव गाव हे तालुक्याचा मुख्य ठिकाणापासून अवघ्या ५ कि.मी. अंतरावर मार्लेश्वर तीर्थ क्षेत्राच्या मुख्य रस्त्यावर आहे. देवरुख शहर ज्या मुख्य सप्तलिंगी नदीकाठी वसलेले त्या नदीचा उगम स्थान हातिव गावातून होतो. गावाच्या खालील बाजून बावनदी जात असली तरी तिचा फारसा फायदा आमच्या हातिव गावास होत नाही बावनदी पासून मुख्य गाव साधारण ७५० मी उंचीवर आहे तरीही आम्ही राबिवलेली उपक्रमामुळे व नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये आम्ही नदी व गावातील छोटे छोटे प-या मध्ये लोकसहभागातून घालत असलेले छोटे मोठे बंधारेमुळे आम्ही गावाला बारमाही दररोज पाणी देण्यात यशस्वी ठरतो . ग्रामपंचायतीने राबवीत असलेले नाविन्यपूर्ण उपक्रमांचा गावाला खूपच फायदा होत आहे.

सन २००० पूर्वी २६ वाड्यांचे १ ग्रामपंचायत हातिव होती परंतु प्रशासनाच्या दृष्टीने १ मे २००० रोजी गावाचे विभाजन होऊन ३ ग्रामपंचायती मध्ये रुपांतर झाले त्यामध्ये मुरादपूर, हरपुडे व हातिव या तीन नवीन ग्रामपंचायत स्थापन झाल्या. हातिव गावामध्ये गोठणे गावाचे पुनर्वसन होऊन येथे नव्याने गाव वसला आहे.

आमच्या गावाला मिळालेले पुरस्कार –
1) निर्मल ग्राम पुरस्कार
2) यशवंत पंचायत राज पुरस्कार
3) National Water Award
4) आर. आर. आबा स्मार्ट पुरस्कार
5) संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान
6) प्रधानमंत्री/रमाई आवास योजना राज्यस्तर पुरस्कार
7) ODF ++

स्वच्छता व पाणी यामध्ये ग्रामपंचायतीने घेतलेले निर्णय व त्यावर आमच्या लोकांनी लोकांसाठी लोकसहभागातून केलेले काम यामुळे आमच हातिव गाव जिल्ह्यासह राज्यात काम करण्यात आघाडीवर आहे. स्वच्छतेचा पहिला पुरस्कार सन २००६ सालीचा निर्मल ग्राम पुरस्कार भारताचे अकरावे राष्ट्रपती डॉक्टर ए. पी. जे. अब्दुल कलाम सर यांचे शुभहस्ते मिळालेला आहे. त्यानंतर संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान पुरस्कार मिळाला आहे. सन २०२३/२४ मध्ये जिल्ह्याचा दहा लाखाचा आर. आर. आबा पाटील स्मार्ट ग्राम पुरस्कार मिळाला आहे. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानमध्ये सन २०२४-२५ चा जिल्हा स्तरियचा रक्कम रुपये ३ लक्ष पुरस्कार प्राप्त झाला आहे. आमच्या गावाला पाण्यासाठीचा दिला जाणारा National Water Award जाहीर झाला आहे. राज्यस्तरावर प्रत्येक जिल्ह्याला दरवर्षी मिळणारे पंचायत लर्निंग सेंटर (PLC) रक्कम रुपये ७ लक्ष या वर्षीचा आमच्या हातिव गावाला मिळाले आहे. जिल्ह्यातील स्वच्छतेच्या बाबीतील ८ प्रकारच्या कचरा विलगीकरणची पहिली सेग्रीगेशन शेडचे काम आमच्या हातिव गावामध्ये झाले आहे त्यामध्ये (प्लास्टिक, काच, धातू, कापड, रबर, ई वेस्ट, लोखंड, थर्माकोल व इतर प्लास्टिक ) हा सर्व प्रकारचा कचरा एका छताखाली एकत्रित केला जातो.

पहेलगाम येथे दुर्दैवी हल्ला झाल्यानंतर ७ मे ला संपूर्ण देशभरामध्ये “मॉक ड्रिल” करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ५ ठिकाणी याच प्रत्याक्षित झालं त्यातही एक ग्रामपंचायती मध्ये हे प्रात्यक्षिक करावयाचे होते ते करण्याचा मान जिल्हा परिषदने आमच्या हातिव गावाला दिला. यामध्ये आम्ही ५ भागात हे प्रत्याक्षित करून सादरीकरण केले. यामध्ये तालुकास्तरीय सर्वविभागाने हिरेहीरेने भाग घेतला व यशस्वी प्रत्याक्षित सादर केले.

राज्यस्तरावरून दरवर्षी प्रत्येक जिल्ह्याला एक पंचायत लर्निंग सेंटर (PLC) मंजूर केले जाते सन २०२४-२५ चे पंचायत लर्निंग सेंटर चे आमचा हातिव ग्रामपंचायतला मंजूर झाले असून त्यासाठी राज्य शासनाकडून रक्कम रुपये ७ लक्ष हातिव गावाला मिळाले आहे. यातून ग्रामपंचायत इमारती मध्ये लर्निंग सेंटर ची सुसज्ज व्यवस्था होणार आहे.

लोकसंख्या२३६७
पुरुष ११६६
स्त्रिया१२०१
महसुली गावे
ग्रामपंचायत सदस्य
एकूण भौगोलिक क्षेत्र७५७.४७ हेक्टर
शाळा
आरोग्यकेंद्र
अंगणवाडी
एकूण कुटुंबे५७१
मुख्य उत्पादनेआंबा, काजू, नारळ, सुपारी, फणस, कोकम
Scroll to Top