जिल्ह्यातील स्वच्छतेच्या बाबीतील ८ प्रकारच्या कचरा संकलन व विलगीकरणची पहिली सेग्रीगेशन शेडचे काम हातिव गावामध्ये झाले आहे त्यामध्ये (प्लास्टिक, काच, धातू, कापड, रबर, ई वेस्ट, लोखंड, थर्माकोल व इतर प्लास्टिक ) हा सर्व प्रकारचा कचरा एका छताखाली एकत्रित केला जातो. ही शेड बांधण्यासाठी शासन स्तरावरून कोणताही निधी उपलब्ध नसतानाही लोक सहभागातून याची उभारणी करण्यात आली आहे.