विद्यामंदीरे



आमच्या गावातील शाळा नं. १ ला जिल्हा परिषदेचा सन २०२४-२५ चा आदर्श शाळा पुरस्कार मिळाला आहे. या पूर्वीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कीर्ती किरण पूजार साहेब असताना जिल्हा परिषदेने आपुलकी मिशन कार्यक्रम राबविला होता यामध्ये आम्ही संपूर्ण गावात शैक्षणिक उठाव करून १२ लाख रुपये जमा केले होते या मध्ये या अभियानात जिल्ह्यात दुसरा क्रमांक बक्षीस मिळाले होते. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात तालुक्यात प्रथम जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक सह ३ लाखाचे बक्षीस मिळाले आहे.