धार्मिक स्थळे
हातिव गावाच्या वैभवात भर घालणारी हातिव गावची ग्रामदैवता श्री देवी आई जुगाई व काळीश्री असून गावाच्या मध्यभागी गाव मंदिर आहे. मंदिरातील मूर्ती पांडव कालीन असल्याचे माहिती सांगितली जाते. याठिकाणी शिवकालीन पायवाट व शिवकालीन चौकी असून शिवकालीन तळ्याला छत्रपती संभाजीमहाराजांनी भेट दिल्याचे इतिहासामध्ये नोंद आहे. मंदिरा जवळील परिसरात ७.५० हेक्टर मुबलक जागेत १८ प्रकारच्या वेगवेगळ्या जातीच्या आयुर्वेदिक वृक्षांची लागवड करून “ऑक्सिजन प्लांट” ची निर्मिती केलेली आहे. याची माहिती देशासह परदेशात पसरली आहे. यासाठी सलग २ पावसाळयामध्ये अमेरिकन २५ नागरिक भारत भ्रमण ला आले असता त्यांनी हातिव गावाला भेट देऊन नवीन झाडांची स्वत: लागवड केली आहे. अमेरिकन नागरीकांनी आमच्या हातिव गावासह संपूर्ण राज्याच कौतुक केले आहे.
हातिव गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालया शेजारी गावच्या सहाणे समोर हे दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे. येथे हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
हातिव गावामध्ये शेलारवाडीत आहे. येथे हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. हा उत्सव ५ दिवस चालतो.
हातिव गावामध्ये सर्व धर्म समभावाप्रमाने लोक राहत असून गावामध्ये मुस्लिमवाडी ही आहे. या वाडी मध्ये २ गावांचे मिळून एकच जामा मस्जिद आहे. या ठिकाणी दररोज ५ वेळा अजाण होते.
हातिव गावात बौद्धवाडीमध्ये मध्यभागी बौद्ध विहार आहे. येथे लोक ध्यान, प्रार्थना आणि भगवान बुद्धांच्या शिकवणींचा अभ्यास करतात. हे ठिकाण शांतता, समता आणि बंधुत्वाचा संदेश देणारे पवित्र स्थान आहे.