आमचे उपक्रम

सेग्रीगेशन शेड

जिल्ह्यातील स्वच्छतेच्या बाबीतील ८ प्रकारच्या कचरा संकलन व विलगीकरणची पहिली सेग्रीगेशन शेडचे काम हातिव गावामध्ये झाले आहे त्यामध्ये (प्लास्टिक, काच, धातू, कापड, रबर, ई वेस्ट, लोखंड, थर्माकोल व इतर प्लास्टिक ) हा सर्व प्रकारचा कचरा एका छताखाली एकत्रित केला जातो. ही शेड बांधण्यासाठी शासन स्तरावरून कोणताही निधी उपलब्ध नसतानाही लोक सहभागातून याची उभारणी करण्यात आली आहे.

उद्यान

उद्यान

ग्रामपंचायत मार्फत गावच्या सहाणेजवळ सार्वजनिक ठिकाणी लहान मुलांसाठी सुंदर उद्यान तयार करण्यात आले आहे. या उद्यानात मुलांसाठी घसरगुंडी, सी-सॉ, झोपाळे बसवण्यात आले आहेत.

Scroll to Top